जिल्ह्यात ५११ कोरोनाबाधित : ३१३ रूग्णांनी कोरोनावर केली मात
जळगाव (प्रतिनिधी सिध्दांत सोनवणे) – आज संपूर्ण दिवसभरात जिल्ह्यात ५११ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरासह जामनेर तालुक्यातही रूग्ण संख्या वाढल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या अहवालातून गेल्या चोवीस तासांमध्ये ५११ कोरोनाबाधित आढळले असून याच कालावधीत जिल्ह्यातील ३१३ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. रूग्णसंख्येचा विचार केला असता सर्वाधिक २६७ रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तर जामनेर तालुक्यात आज दिवसभरात ७८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोपडा तालुक्यातील रूग्ण संख्या वाढीस लागली असून आज येथे ३८ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव तालुका-१२; भुसावळ तालुका-३१; धरणगाव-१६; एरंडोल-७; यावल-२; रावेर आणि पारोळा-प्रत्येकी ६; मुक्ताईनगर-२१; बोदवड-१४; अमळनेर-१ असे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात एकही पेशंट आढळलेला नाही. आजच्या दिवसात घडलेली दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात जिल्ह्यात एकाच कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.






