मुंबई पुणे मार्गावर बोरघाटात बसचा अपघात, चार ठार
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मुंबई – पुणे मार्गावर बोरघाटात बसचा अपघात आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. खंडाळा बोरघाटात गारमाळ पाँईंट जवळील वळणावर आल्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, बस खाली ६० फूट दरीत कोसळणार तोच बससमोर एक छोटे झाड आल्याने, मोठी दुर्घटना टळली आहे.
पुण्याहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ढेकूजवळ खासगी बसचा अपघात झाला. अपघातानंतर बस सुमारे ६० फूट खोल दरीत कोसळणार होती. मात्र सुदैवाने बस दरीत कोसळण्याआधी एका झाडामुळे रोखली गेली आणि मोटी दुर्घटना टळली. बोरघाट उतरताना खोपोलीजवळ अपघात झाला. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होती.

दुर्दैवाने या अपघातात 2 वर्षाचा चिमुकला, एक युवती, एक पुरुष एक महीला जागीच ठार झाले आहेत. तर अंदाजे 30 प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम कामोठे, खोपोली रुग्णालय, पवना रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय येथे जखमींना हलवण्यात आले आहे.






