अल्पवयीन मुलीची छेड काढणे ‘त्याच्या’ जिवावर बेतले

पीडितेची आई व काकाने केलेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

छतरपूर (मध्य प्रदेश) – जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पीडितेच्या आईने आणि काकाने आरोपीला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याचा मृत्यू झाला.

छतरपूर जिल्ह्यातील ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांदिया गावात ही घटना घडली. हेतराम कुशवाहा असे मृताचे नाव आहे. त्याने गावातीलच अल्पवयीन मुलीची घरात घुसून छेड काढल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यावरून पीडितेच्या आईने आणि काकाने त्याला बेदम मारहाण केली होती.

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या हेतराम याला जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी हेतरामला मृत घोषित केले. हत्या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलीची आई आणि काकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here