वृत्तपत्र छायाचित्रकार,आपत्ती व सुरक्षा मित्र विकास रणपिसे यांना भगिनींशोक

अलिबाग-सोगावकर – मार्च आपत्ती व सुरक्षा मित्र,दैनिक प्रतिविर, सोलापूरचे अलिबाग तालुका छायाचित्रकार विकास रणपिसे यांची मोठी भगिनी सौ.हर्षदा हरीचंद्र वाघमारे वय वर्षे 60 रा.रामराज,ता.अलिबाग-रायगड हिचे हृदय विकाराने रविवार दि.७ मार्च २०२१ रोजी दुपारी अंदाजे ४:३० च्या सुमारास वाजता निधन झाले आहे, त्यांच्या अंतिम विधींसाठी समाजातील तसेच इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हर्षदा वाघमारे ह्या केंद्र शिक्षिका होत्या,तसेच त्या बौद्ध धर्म शिक्षण देण्याचे महान कार्य करत होत्या. त्यानां मुलबाळ नव्हते, त्यांच्या पश्चात नवरा,भाऊ विकास रणपिसे, भावजय,भाचे व भाची आदी परिवार आहे, वाघमारे व रणपिसे कुटुंबावर आलेल्या दुःखात ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील,मंगेश राऊत,अब्दुल सोगावकर, कुटुंबीय,तसेच अनेक पत्रकार बांधव मित्रपरिवार सामील होऊन त्यांचे सांत्वन केले.

हर्षदा वाघमारे यांचे उत्तरकार्य शुक्रवार दि.१२ मार्च २०२१ रोजी रामराज-अलिबाग राहत्या घरी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here