एकाच मुलीवर प्रेम जडल्याने दोघा भावंडांनी केली ट्रेनखाली आत्महत्या

बूंदी (राजस्थान) – जिल्ह्यातील केशवरायपाटन येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा दोघा भावांनी ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. दोघेही सख्खे चुलत भाऊ होते. सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह रेल्वे रुळांवर आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवले. दोघांच्या हातावर एकाच मुलीचे नाव लिहिलेले होते. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, प्रेम प्रकरणातून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. दोघेही एकाच मुलीवर प्रेम करत होते. या घटनेची चौकशी केली जात आहे.

गुडलाजवळ दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर ही घटना घडली. रेल्वे रुळांवर दोघांचेही मृतदेह आढळून आले. रुळांनजीक त्यांची दुचाकी सापडली. दोघेही तरुण दुचाकीवरून या ठिकाणी आले. त्यांनी एकाचवेळी ट्रेनखाली आत्महत्या केली. दोघेही सख्खे चुलत भाऊ होते. एक जण बूंदी येथे शिक्षण घेत होता. तर दुसरा त्याच्यासोबत राहत होता. तो नोकरी करत होता.

दोघेही मूळचे दबलाना हद्दीतील केशवपुरा गावातील रहिवासी होते. दोघांच्या हातावर एकाच मुलीचे नाव होते. यावरून असे दिसते की, या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम होते. कोणत्या तरी गोष्टीवरून दोघांमध्ये वाद किंवा काहीतरी घडले की दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केली. मृतांजवळील मोबाइल फोनवरूनच त्यांची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here