घरफोडीतील मुद्देमाल वाटणीचा वाद रंगला रस्त्यावर; घरफोड्यांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – घरफोडी करणाऱ्या एका टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पैशाच्या वाटणीतून रस्त्यावर केलेल्या वादातून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीकडून घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. सांगलीच्या जुना बुधगाव रोड वरील समाजकल्याण कार्यालयासमोर काही लोक पैशाच्या वाटणीवरून वादावाद आणि दंगा घालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या ठिकाणी जाऊन गेंड्या उर्फ आकाश जाधव (वय वर्षे 19), करण रामा पाटील, (वय 21) आणि रोहित सपाटे (वय 19) या तिघांच्यासह एक बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल आढळून आला. यानंतर तिघांना अटक करत अधिक चौकशी केली असता, सांगली शहर आणि ग्रामीण हद्दीतील 10 उघडकीस आले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात क्राइमच्या घटनांवर नियंत्रण होतं, मात्र लॉकडाऊन संपताच मोठ्या प्रमाणात गुन्ह्याच्या घटना समोर येत आहे. यामध्ये घरफोडी, चोरीच्या घटना जास्त असल्याचं दिसत आहे. असाच प्रकार सांगली येथे घडला आहे. अखेर सांगली पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे ही सराईट आरोपी नसल्याचं दिसत आहे. आरोपींचे वय देखील कमी आहे. मात्र यावर वेळीत नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here