मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात नेमकी कोणाला संधी मिळाली, हे भारताचा कर्णधार विराट कोहलीने जाहीर केले आहे. नाणेफेकीचा कौल लागल्यावर दुसऱ्या सामन्यात कोणत्या खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे, याबाबत कोहलीने यावेळी माहिती दिली. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या संधीचे सोने सूर्यकुमार आणि इशान कसे करता, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. या दोघांनाही आतापर्यंत आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी दिली तर भारताच्या फलंदाजीली अधिक धार येऊ शकते.
भारताने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ आता प्रथम फलंदाजी करताना किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला १२४ धावांवरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या सामन्यात काय होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
BIG DAY for @surya_14kumar & @ishankishan51 who are all set for their T20I debuts 😎😎
What a moment for these two 🧢💙 #TeamIndia 🇮🇳🇮🇳#INDvENG @Paytm pic.twitter.com/cFVVxDgvIO
— BCCI (@BCCI) March 14, 2021
पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माला संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर विराट कोहलीवर जोरदार टीका सोशल मीडियावर झाली होती. त्याचबरोबर काही माजी खेळाडूंनीही रोहितला विश्रांती देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात रोहितला खेळवायला हवे, अशी चाहत्यांची मागणी होती. फिरकीपटू युजवेंद्र चहल गेल्या लढतीत आपला शंभरावा ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. पण या सामन्यात सर्वाधिक धावा या चहलने दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चहलला संधी मिळणार नसल्याचे म्हटले जात होते.






