ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – साकीनाका जंक्शन परिसरात असणाऱ्या नीलकंठ भवन याठिकाणी ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम याठिकाणी सुरू होते. साधारण 1 नंतर ही आग विझवण्यास अग्नीशमन दलाला यश मिळाले आहे. दरम्यान या परिसरातील आगीचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये धुराचे लोट आसमंतात जाताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर देखील स्थानिकांनी याठिकाणचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचं, या व्हिडीओजमध्ये पाहायला मिळत होतं.
साकीनाक्यातील हा परिसर तसा जास्त रहदारी आणि वाहनांची येजा असणारा परिसर आहे. जवळच बस स्टॉप देखील आहे. परिणामी या आगी धुरामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसंच याठिकाणी हॉटेल्स, बँक आणि इतर अस्थापनं देखील मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता होती. पण आता आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.






