मराठमोळ्या अभिनेत्रीचा ब्रिटीश अवतार

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, ट्विट्स आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, ट्विट्स आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील तिनं असेच काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लक्षवेधी बाब म्हणजे या फोटोशूटसाठी तिनं ब्रिटीश शैलीचा रॉयल रेट्रो लूक धारण केला होता. “ती राणी आहे. फरक फक्त इतकाच की तिचा आत्मा श्रीमंत होता” अशा आशयाची कॉमेंट तिनं या फोटोंवर केली आहे. या फोटोंच्या माध्यमातून तिनं ब्रिटनची दिवंगत राजकुमारी डाएना हिला श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here