मी पाहिलेले साहेब

पुणे (पंढरी गायकवाड) –

(राहुल दूबाले)
आज तावडे साहेबांचा वाढदिवस
माझा आणि तुमचा परिचय काही 2012 साली झाला राजकारण आणि समाजकारण काय असते हे समजायच्या आधीच एक परीस म्हणजे तावडे साहेब तुमचा सहवास लाभला.सहवास कसला संघर्षाचे विद्यापीठ मी अनुभवले तुम्ही संघर्ष केला तो पक्षाबाहेरील विरोधक आपले करण्या साठी व आप्त स्वकियानच्या विरोध संपवण्या साठी.काम करून घेण्यासाठी साहेब साहेब म्हणून मागे फिरणारे तेच तुमच्या कधीच समर्थानात उभा राहिले नाही पण कधीच तुम्ही त्यांचा द्वेष केलेला मला आठवत नाही जेव्हा तिकीट नाकारले तेव्हा खूप आपल्या जवळच्या लोकांनी पाठ फिरवली त्यांच्या नरजेत तुम्ही व्हिलन झालात पण ह्या अव्हेलनेने हरेल तो विनोद तावडे कसला…? राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणे ज्याच्या रक्तातच आहे त्याला कोणी रोखुचशकत नाही राखेतून भरारी कसे घेतात हे तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले साहेब मला आज ही आठवते सामाजिक काम असो व वयक्तिक आणि तो तुमच्या कडे येणारा कोणत्याही पक्षाचा असो तो तुमच्या कडून रिकाम्या हाताने गेला नाही आणि ही गोष्ट मी जेव्हा पासून भेटलो तेव्हा पासून आज ही तशीच आहे 2012 ला माझ्या परिवारावर खूप मोठे संकट आले होते तेव्हा तुम्ही विरोधीपक्ष नेते होतात माझी ओळख नसतांना माझ्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून आपण मला न्याय देण्यासाठी ऐका देवदूतप्रमाणे माझ्या व माझ्या परिवाराच्या पाठीशी रक्ताच्या नात्या प्रमाणे उभे राहिलात ही गोष्ट मी मरे पर्यंत विसरू शकत नाही ज्या वेळेस मी 2012 ला तुम्हाला पहिला फोन केला त्या वेळेस तुम्ही मला म्हणले तुझ्या सोबत आहे काही काळजी करू नको हे शब्द माझ्या परिवाराला आधार देणारे होते त्या नंतर तुम्ही माझ्या सारख्या सामान्य मुलाला स्वतःच्या सहवासात आणलेत ऐका लहान भावा प्रमाणे माझ्यावर प्रेम केलेत मला जनतेची सेवा करण्याची डिग्री विनोद तावडे या विद्यापीठातून मिळाली साहेब हेच नाही कित्तेक वेळेस अनेक प्रश्न मी आपल्या कडे घेऊन आलो कधीही तुम्ही नकार दिला नाही महाराष्ट्रातील पोलीस यांचे प्रश्न तुमच्या कडे मांडले त्यातील प्रश्न सोडवण्या साठी तुम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला ते काम पूर्ण होत नाही तो पर्यंत त्याचा पाठपुरावा केलात एक गोष्ट मला चांगलीच आठवते रात्र झाली तर राहुल परत जायचे नाही मुक्काम कर सकाळी जा ही काळजी वहीनी मध्ये आई चे रूप होते बीड येथील राहुल जेवलास का रात्री प्रवास करायचा नाही हे ते माऊलीचे शब्द माझ्या साठी असतात कधी कधी एवढ्या व्यस्त कामातून तुम्ही मला विचारात होतात राहुल तू मुंबईत आल्यावर राहतो कुठे हेच शब्द मला तात्काळ छत भेटल्या सारखे वाटायचे मी ना पक्ष्याचा ना मतदार संघाचा तरी ही माझ्यावर एवढं प्रेम केलेत मी त्या प्रेमाला कधीही तडा जाऊ देणार नाही एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारले की राहुल दूबाले कोण आहे साहेब त्या वेळेस तुम्ही म्हणाईचात माझा माणूस आहे हे शब्द त्या व्यक्ती कडून ऐकले की छाती फुगून येईची राहुल दूबाले या नावाचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूबाले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना येथे आणून ठेवलेत ह्या माझ्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही आहात राहुल लोकांची जेवढी मदत करता येईल तेवढी करत राहा अपेक्षेने माणसाचा नाश होतो सेवा करा समाधान मिळेल .मंत्रालयाच्या बिल्डिंगवर जाऊन कोणी आत्महत्या करणारा असेल किंवा कोणी पावसात उपोषण करत असणाऱ्या आमदाराला पण आपण सहकार्य केले तुमची भावना व कार्यशैली महाराष्ट्राला दिशा देणारी आहे साहेब मला लवकरच आपल्याला महाराष्ट्राच्या उचस्त पदावर बसलेले बघायचे आहे आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ही आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो भरपूर काही लिहिण्या सारखे आहे पण थोडक्यात तुमच्या बद्दल माझ्या भावना व्यक्त केल्या काही चुकले तर माफ करा आपल्या सहवास आयुष्यभर सोडणार नाही व आपला एकलव्य बनून कायम आपल्या सेवते राहील ही शपथ घेतो
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तावडे साहेब!
(लेखक महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य आहेत.) मोबाईल – 9822668252

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here