राहुरी परिसरात रस्त्याच्या कडेला युवती मृतावस्थेत आढळली

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – अहमदनगरमधील राहुरी तहसील परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला एक अज्ञात युवती मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

ही घटना काल रात्री १ ते २ च्या सुमारास घडली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विकास गीते नामक व्यक्ती आपल्या पोल्ट्री पक्ष्यांना घेऊन जाण्याकरिता मनमाड हायवेवरून जात असताना त्यांनी रस्त्याच्या कडेला एक पंजाबी कपडे घातलेल्या मुलीचा मृतदेह पाहिला. मृतदेह पाहताच त्यांनी राहुरी पोलीस स्थानकाला ही बातमी कळवली.ahmednagar-police

बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली आहे. चौकशीदरम्यान मृत युवतीच्या हात तसेच अंगठ्यावर ‘SP’ असा टॅटू असल्याचे आढळले आहे. युवतीचा मृतदेह पोस्टमार्टम करण्याकरिता पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान या युवतीविषयी कोणाला माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here