भरदिवसा गोळ्या झाडून चार्टर्ड अकाउंटंटचा ‘खून’

नवी दिल्ली – भर दिवसा घरासमोर उभ्या असलेल्या चार्टर्ड अकाउंटंटचा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील आदर्शनगरमध्ये सकाळी घडली. अनिल अग्रवाल असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अग्रवाल हे घराबाहेर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर अग्रवाल जखमी होऊन जमिनीवर पडले होते. काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर गोळीबारानंतर पसार झाले.

घनेची माहिती मिळताच आदर्शनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावरील भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पुढील तपास आदर्शनगर पोलीस करत आहेत.

दरम्यान, दिल्लीतील गुन्हे आणि गन्हेगारांना रोखल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी, गुन्हेगार अजूनही मोकाट असल्याचे दिसते. आज सकाळी घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here