अल्पवयीन मुलीवर ९ दिवस केला २० जणांनी सामूहिक अत्याचार

हाडौती (राजस्थान) – येथील परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. १५ वर्षीय मुलीवर १५ ते २० जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या मुलीवर सलग नऊ दिवस अत्याचार करण्यात आले आहे. ही घटना कोटा जिल्ह्याच्या सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ४ अल्पवयीन मुलांसोबत २० आरोपींना अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे, या घटनेत एक महिला देखील सामील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अत्याचार केल्यानंतर वेदनेने विव्हळणाऱ्या बालिकेला आरोपी नशेची औषधे द्यायचे. तिला मारहाणही करायचे. घरी जाऊ देण्याविषयी बोलल्यावर आरोपी तिला चाकूचा धाक दाखवायचे, अशी माहिती उघड झाली आहे.

माहितीनुसार, ५ मार्चला आरोपी महिला बुलबुल आणि पूजा पीडितेला झालावाडच्या सुकेतमध्ये घेऊन गेल्या. गागरोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पीडिता आपल्या आईला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपबीती सांगितली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या प्रकणाची दखल घेऊन आरोपींची धरपकड सुरू केली. विविध पथके नेमली. आतापर्यंत चार अल्पवयीन मुलांसह २० जणांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here