मद्यधुंद महिलेचा महामार्गावर धिंगाणा

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा टोलनाक्याजवळ एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याचा प्रकार काल सायंकाळी घडला. पोलिसांनी विचारपूस सुरु केली असता महिलेने पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडली. त्यांना धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

या प्रकरणी महिलेसह दोघांवर नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान महिलेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुन्या टोलनाक्या जवळील हॉटेल शीतलपासून पुढे महामार्गालगत अलका किशोर पाटील (वय 40 रा. डोंगरे महाराज नगर, धुळे ) आणि तिचा दीर भूषण ज्ञानेश्वर पाटील (रा. हातनुर ता.शिंदखेडा ) हे रस्त्यावर गोंधळ घालत होते.

या ठिकाणी गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी आले. पोलीस पुरुषाला विचारणा करत असताना महिलेने पोलिसांनाच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. घटनास्थळहुन पोलिसांनी दारुच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. संबंधित महिला आणि पुरुषाने म्हणजेच तिच्या दीराने मद्यप्राशन केल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here