प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला विवस्त्र करून मारहाण

रतलाम (मध्यप्रदेश) – प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाला तिच्या नातेवाईकांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचं वृत्त आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उजेडात आली.

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. रतलामच्या बडावदा येथे या तरुणाची प्रेयसी राहते. येथील पोलिसांकडे एक व्हायरल व्हिडीओ आला होता. त्यात काही जण एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण करत असल्याचं दिसून येत होतं.

हा व्हिडीओ पाहून पोलिसांनी यातील आरोपींना तसेच पीडित तरुणाला शोधण्याची कारवाई केली. तेव्हा त्यांना समजलं की, हा तरुण माकडोन जिल्ह्यात राहतो. तर त्याची प्रेयसी बडावदा येथे राहते. तो तिला भेटायला आला होता. या प्रकाराची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली आणि त्यांनी त्याला विवस्त्र करून मारहाण करायला सुरुवात केली.

काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. पोलिसांनी या तरुणाचा पत्ता शोधला आणि त्याच्या घरी गेले. पण, त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार करण्यास नकार दिला आहे.

पोलिसांना आरोपीविरोधात कारवाई करणं आवश्यक असल्याने ते त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न रत आहेत. मात्र, ही बाब खासगी असल्याचं सांगून तरुणाचे कुटुंब तक्रार करण्यास पुढे आलेलं नाही. त्यामुळे आरोपींचा शोध लागूनही पोलिसांनी अद्याप त्यांच्याविरोधात कारवाई केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here