अहमदनगर (प्रतिनिधी) – न्यायालयामध्ये काम करत असलेल्या क्लार्कने एका शिक्षिकेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून
तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र राजेंद्र सोनवणे (वय ३१ रा. तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने रात्रीच आरोपी सोनवणे याला राहाता येथून अटक केली आहे.
फिर्यादी आष्टी तालुक्यात (जि. बीड) शिक्षिका म्हणून नोकरीला असून त्या नगरमध्ये राहतात. त्यांची काही दिवसांपूर्वी आरोपी सोनवणे सोबत ओळख झाली होती. फिर्यादी शिक्षिका व त्यांच्या पतीचे न्यायालयात वाद सुरू होते. फिर्यादी शिक्षिका व आरोपी सोनवणे यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. सोनवणे याने फिर्यादी शिक्षिकेस पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. तू घटस्फोट घेतल्यानंतर आपण लग्न करू असे सोनवणे फिर्यादला म्हणाला. काही काळ आरोपी सोनवणे व फिर्यादी शिक्षिका एकत्र राहिले. फिर्यादीने पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी लग्नही केले. फिर्यादी यांनी सोनवणेकडे कायदेशीर पद्धतीने लग्न करण्याची अट घातली.






