अमरावती (प्रतिनिधी) – पोर्न व्हिडीओ पाहून आजची तरुण पिढी बिघडत चालली आहे याचे जिवंत उदाहरण येथे पाहण्यास मिळाले आहे. पोर्न व्हिडीओ पाहून मर्कट बुध्दी झालेल्या मुलाने दारु प्यायल्यानंतर स्वतःच्या आईवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील जीवनपुरा याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाने आई आणि मुलगा या नात्याला कलंक फासला आहे. त्याने गुरुवारी दुपारी दारुच्या नशेत आपल्याच जन्मदात्या आईला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. या संतापजनक घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील जीवनपुरा भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय युवकानं आपल्या आपल्या जन्मदात्या 45 वर्षांच्या आपल्या आईवर अतिप्रसंग केला आहे. आईवर अत्याचार करत असताना आरोपी मुलगा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी मुलाने गुरुवारी दुपारी अश्लील चित्रफित पाहिल्यानंतर आपल्याचं आईवर लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर आरोपी मुलाने घरातून पळ काढला. तर पीडित महिला शेजारील कुटुंबीयांकडे आश्रयाला गेली.






