जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा इशारा

टोकियो – जपानमध्ये शनिवारी 7.2 रिश्टर स्केल भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपानंतर वेधशाळेकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱयानंतर प्रशासनाने समुद्र किनाऱयावरील लोकांना सतर्क राहण्यासाठी अलर्ट जारी केला.

जपानच्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी मायागी भागात हा भूकंप झाला. यावेळी जमिनीपासून 60 किमी आत या भूकंपाचे झटके बसल्याचे दिसून आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे समोर आले नाही. मात्र, जपानमधील उत्तर पूर्व किनारपट्टीच्या भागात हे भूकंपाचे धक्के बसल्यामुळे लोक भयभीत झाल्याचे सांगितले जात होते.

जपानने मागच्या दहा वर्षांपूर्वी मोठा भूकंप आणि त्सुनामी अनुभवली होती. नुकतेच गेल्या 11 मार्चला या दुःखद घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील सर्व देशांपैकी जपान हा देश भूकंपप्रवण देश म्हणून ओळखला जातो, याठिकाणी सातत्याने भूकंपाचे धक्के बसतात. जपान हा देश भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here