डोंबिवलीत बारबालेची घरात घुसून केली हत्या

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – घरात घुसून 46 वर्षीय बारबालेला मारहाण करत तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरात घडली आहे. आरती सकपाळ असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी श्रीनिवास पुजारी (33, रा. कल्याण) या तिच्या प्रियकराला क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने शनिवारी दुपारी रेल्वे ब्रिजवरून बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.

मृत आरती डोंबिवली पश्चिम भागातील कोपर रोडवरील एका इमारतीमध्ये एकटीच राहत होती. ती उदरनिर्वाहासाठी कल्याणच्या एका बारमध्ये महिला वेटर म्हणून काम करत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे बारमधील नोकरी गेल्याने गेल्या काही महिन्यांपासून ती राहत असलेल्या परिसरातच मच्छीविक्री करत उदरनिर्वाह करत होती.

शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास मृत आरतीच्या नातेवाईकांनी तिला मोबाईलवर संपर्क केला होता. मात्र, मोबाईल न उचलल्याने त्यांनी तिच्या घरी जाऊन पाहिले असता आरती मृतावतस्थेत आढळली. आरतीच्या गळ्यावर, हातावर जखमा असून तिची साडीने गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पसार झालेला श्रीनिवास पुजारी (33, रा. कल्याण) या तिच्या प्रियकराला क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने रेल्वे ब्रिजवरून बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here