किन्नर शितल नायक ह्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर

अमरावती (प्रतिनिधी) – अमरावती येथील किन्नर शितल नायक ह्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत. हरिद्वार येथील कुंभमेळ्यात त्यांना महामंडलेश्वर उपाधी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात जन्मलेल्या किन्नर शितल नायक यांना महामंडलेश्वर हे सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे.

एका गरीब कुटुंबात जन्मलेली अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि उपेक्षित भागामधून जीवन जगत असलेल्या शितल आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहे. धामणगाव सारख्या ग्रामीण भागातील किन्नर शितल नायक यांना विदर्भाचे सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. हरिद्वार येथील कुंभमेळ्यात त्यांची महामंडलेश्वर म्हणून नियुक्त झाली आहेत. अशा प्रकारचा सन्मान ग्रामीण भागात पहिल्यांदाच एखाद्या किन्नरला मिळाला आहे.

मुळच्या अमरावतीच्या असलेल्या शितल नायक यांना त्या जन्मापासूनच किन्नर असल्याने आई-वडिलांनी लहानपणीच किन्नर गुरूकडे सोपवून दिले. काही वर्षांनंतर शितल नायक आपल्या गुरु सोबत धामणगाव येथे वास्तव्यास आल्या. वृद्धपकाळामुळे गुरूच्या निधनानंतर परंपरेनुसार शितल यांना नायक म्हणजेच गुरू पदवी देण्यात आली. किन्नर असतानाही माझ्याकडे कोण कोणत्या भावनेने पाहतो. याचा विचार न करता शितल नायक यांनी हिंदीत पदवीधरपर्यंत शिक्षण पूर्ण केले. या काळात त्या विविध प्रकारच्या आध्यात्म व सामाजिक कार्यक्रमात सदैव अग्रेसर असत. शीतल नायक यांच्या अध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय किन्नर आखाड्याने शितल यांची विदर्भाची महामंडलेश्वर म्हणून हरिद्वारच्या 2021 मधील कुंभमेळ्यामध्ये नियुक्ती केली. महामंडलेश्वर नियुक्तीनंतर शितल नायक यांची हरिद्वार येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी धामणगाव शहरातील अनेक तरुणांनी हरिद्वार येथे हजेरी लावली.

हरिद्वार येथे शीतल नायक यांना जेव्हा विदर्भाच्या महामंडलेश्वर म्हणून सर्वोच्च स्थानावर विराजमान करण्यात आले. त्यावेळी अखिल भारतीय महामंडलेश्वर आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची प्रामुख्याने उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीत शीतल नायक यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. त्रिपाठी यांनी शितलला भविष्याकरिता आशिर्वाद आणि समाज उन्नतीसाठी परिश्रम घेण्याचे मार्गदर्शन केले.

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी अभियानाकरिता शीतल नायक यांनी धामणगाव शहरात तसेच विदर्भातील अनेक शहरांमध्ये फिरून विशेष योगदान दिले. शितल नायक या अभियानात अमरावती जिल्ह्याच्या सदस्यपदी होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here