कर्मयोगी आर.डी.पाटील यांचे कार्य
पाळधी दोनगांव बु (वासुदेव पाटील) – धरणगाव तालुक्यातील दोनगाव बु.येथील ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ आणि माध्यमिक
शिक्षक यांनी जय जलधारा फाऊंडेशन स्थापन केली.प्रेरणा दिली गावातील दानशूर कर्मयोगी आर डी पाटील बापूसाहेब यांनी आईचे मरणोत्तर उत्तरकार्यास खर्च न करता तोच पैसा पाणी साठवण बंधारा साठी दिला.काही पैसा माणसी दररोज एक रूपयाप्रमाणे जमा केला.माध्यमिक शिक्षकांनी दरमहा शंभर रूपये टाकले.आणि असा बंधारा बांधला.एक हजार झाडे लावली.
या बंधाराचे पाणी नाल्यातून वाहून जात होते.ते अडवून एक किमी बैकवाटर तुडुंब भरले.त्यामुळे गावातील विहीरी,बोअरवेल,हातपंपांना पाणी आले.शिवाय शेतातील विहिरींची पाणीपातळी वाढली.आमची बागायत वाढली. या कामाचे विश्वामित्र किशोर पाटील, संजय पाटील,वासुदेव पाटील यांनी व जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष ईश्वर मोरे या कामाचे कौतुक केले.







