धरणगांव न.पा. कार्यालयात नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी
पत्रकार परिषद आयोजित केली होती
धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शहराला सध्या अशुद्ध पाणी पुरवठा व तोही वेळेवर मिळत नसल्या मुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून भारतीय जनता पक्षाने उपोषणे,मोर्चे काढून सुद्धा काहीही सुधारणा होत नसल्यामुळे अर्धा लग्न मोर्चाने आयोजन केले होते परंतु कोरोनामुळे शासनातर्फे परवानगी मिळाली नव्हती त्यामुळे नेहमी वर्तमान पत्रातून पाण्यासंदर्भात वृत्त छापून येत होते.
त्याला पुनर उत्तर म्हणून नगराध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात अनेक अडचणींमुळे पाणी पुरवठा नियमित होऊशकत नाही कधी गाड काढण्यासाठी अडचणी, कधी पाईप लाईन फूटने,कधी मोटरी बंद होणे अश्या अनेक अडचणींमुळे पाणीपुरवठा सुरळीत होऊन शकत नाही आम्हाला सुद्धा वाटते नागरिकांनी आम्हाला निवडून दिले आहे.
त्यांना नियमित पाणी मिळायला पाहिजे विरोधक इतर विकास कामे होत आहेत त्याबाबत बोलणार नाहीत फक्त पाणी पुरवठा सुरळीत होत नाही एवढाच आरोप करीत असतात येत्या आठ ते दहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल व नागरिकांना दर आठ दिवसात रोटेशन मिळेल असे नियोजन करण्यात येणार असून तसे न झाल्यास जे आरोप करीत आहेत त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करावा मी त्यांना सहकार्य करेल असे आवाहन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले.
या प्रसंगी पत्रकार परिषदेत मोजके नगरसेवक वासुदेव चौधरी,भागवत चौधरी,अजय चव्हाण,पत्रकार पी एम पाटील सर,भरतभाऊ चौधरी,कल्पेश महाजन,भगीरथ माळी,विजय पाटील,विनोद रोकडे आदी उपस्थित होते.






