धारावी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांना पोलीस बॉईज असोसिएशन मार्फत कोरोना योद्धा २०२० ने सन्मानित

मुंबई (सिद्धार्थ जाधव):- ज्या धारावी पोलिस स्टेशनच्या परिसरामध्ये काेराेनाची महामारी चालू असताना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना धारावीतील गरीब गरजू लोकांना त्यांच्या घरापर्यंत अन्नधान्य ,सॅनिटायझर, माॅक्सचे वाटप ,तसेच पोलिस स्टेशनमार्फत काेराेना ची लढाई कशा प्रकारे करावी यांची जनजागृती पोलिसांनी प्रत्येक परिसरात जाऊन केली धारावी परिसर हा मोठा असल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी काेराेना पॉझिटिव्ह निघाले त्यात काही अधिकारी शहीद सुद्धा झाले असे असून सुद्धा पोलीस अधिकारी, कर्मचारी हे खचले नाही तरि कोरोना लढाईमध्ये पुन्हा हे याेद्धा उभे राहिले याची दखल सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा घेतली त्यात मुख्यता मुख्यमंत्री ,गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांनी सुद्धा धारावी पोलिस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचारी यांचे काेराेना याेद्धांचे कौतुक केले त्यामुळे धारावीचा संख्या दर हा कमी झाला अशा पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीची दखल म्हणून पोलीस बॉईज असोसिएशन मार्फत धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे (साहेब) व पोलीस कर्मचारी यांना कोराेना योद्धा गौरव २०२० सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले अशा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी काेराेना याेद्धांना पोलीस बॉईज असोसिएशन कडून मानाचा मुजरा
या काेराेणा याेद्धा सन्मानपत्राचे नियोजन पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी ना वैद्य, सिद्धार्थ डी जाधव – प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सुशील मोरे निवड समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अमोल माने प्रदेश अध्यक्ष मुंबई, अमोल पटेकर सरचिटणीस मुंबई, प्रकाश शेरे PRO घाटकोपर यांच्यामार्फत करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here