गगनयान मोहिमेसाठी भारतीय अंतराळवीर सज्ज

मॉस्को (रशिया) – भारताच्या पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयानसाठी भारतीय वायुदलाच्या 4 अधिकाऱयांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या चारही भारतीय अंतराळवीरांचे रशियाची राजधानी मॉस्कोनजीक जियोजनी शहरातील रशियन स्पेस ट्रेनिंग सेंटरमध्ये मागील एक वर्षापासून प्रशिक्षण सुरू होते.

भारतीय गगननॉट्सनी स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे प्रशिक्षण गॅगरीन कॉस्मोनॉट्स प्रशिक्षण केंद्रात पार पडले आहे. भारतीय राजदूतासाब्sात आम्ही भविष्यातील द्विपक्षीय अंतराळ मोहिमेसंबंधी चर्चा केली आहे. रशिया भारतासोबत अंतराळ मोहीम साकारू इच्छित असल्याचे उद्गार रशियाच्या स्पेस कॉर्पोरेशनचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी काढले आहेत.

भारतीय वायुदलाच्या अधिकाऱयांना गगननॉट्स करण्यासाठी इस्रो आणि रशियायच ग्लवकॉस्मॉस यांच्यात जून 2019 मध्ये करार झाला होता. भारतीय वायुदलाच्या 4 वैमानिकांचे (एक ग्रूप कॅप्टन आणि उर्वरित तिघे विंग कमांडर) प्रशिक्षण गॅगरीन कॉस्मोनॉट्स ट्रेनिंग सेंटरमध्ये पूर्ण झाले आहे. त्यांचे प्रशिक्षण 10 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू झाले होते. पण कोरोनामुळे ते काही दिवसांसाठी रोखावे लागले होते. 12 मे रोजी हे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यात आले होते.

रशियात प्रशिक्षण घेतल्यावर या चारही गगननॉट्सना बेंगळूरमध्ये गगनयान मॉडय़ूचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे मॉडय़ूल इस्रोनेच तयार केले असून याकरता कुठल्याच देशाची मदत घेण्यात आलेली नाही. इस्रोने पूर्वी डिसेंबर 2021 पर्यंत गगनयान मोहीम राबविणार असल्याचे म्हटले होते. तर मानवरहित मोहिमेसाठी डिसेंबर 2020 आणि जुलै 2021 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण या दोन्ही मोहिमांच्या प्रक्षेपणाला विलंब होऊ शकतो.

गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2018 रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. मोहिमेकरता 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. गगनयान प्रकल्पात 3 अंतराळवीर सामील असून ते 7 दिवस अंतराळात वास्तव्य करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here