इमरान हाशमीचे किसिंग सीन पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया होती…

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडचा अभिनेता इमरान हाशमीचा याची बॉलीवूडमधील दुसरी ओळख सीरियल किसर अशी आहे. अनेक चित्रपटांमध्ये इतक्या वेळा त्याने किसिंग सीन दिल्यामुळे त्याला ही ओळख मिळाली. आज २४ मार्च, त्‍याचा वाढदिवस. त्याचे पूर्ण नाव सैयद इमरान अनवर हाशमी असं आहे. बोल्ड भूमिकेमुळे त्याच्या खासगी आयुष्यात काय घडलं? त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया, जेव्हा इमरानच्या पत्नीने त्याचे किसिंग सीन पाहिले होते, तेव्हा तिच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती?

इमरान हाशमीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात विक्रम भट्टचा चित्रपट फुटपाथमधून केली. २००३ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील त्याचा अभिनय आणि भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली. यानंतर त्‍याने मर्डर, गँगस्टर, मर्डर-२, आवारपन, द डर्टी पिक्चर, जन्नत आणि वन्स अपॉन टाईम इन मुंबईसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सर्व चित्रपटांमध्ये इमरान हाशमीने आपल्या वेगळ्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केल[ आहे.

इमरान हाशमी बॉलिवूडचा असा एक कलाकार आहे, ज्याने आतापर्यंत बहुतांशी चित्रपटात बोल्ड आणि किसिंग सीन दिले आहेत. त्या-त्या वेळी इमरान हाशमीच्या किसिंग सीनची खूप चर्चा झाली. पण, या बोल्ड भूमिकांचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय फरक पडला?

रिपोर्टनुसार, एकदा इमरानचे बोल्ड आणि किसिंग सीन पाहिलयानंतर त्याची पत्नी परवीनने कशी प्रतिक्रिया दिली होती. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, इमरान हाशमीने २०१४ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये आपल्या पत्नीविषयी अचंबित करणारे खुलासे केले होते.

हाशमीने खुलासा केला होता की, माझी पत्‍नी परवीनने मर्डर चित्रपट पाहिल्यानंतर लव्ह मेकिंग सीनवर प्रतिक्रिया दिली होती. परवीन म्हणाली होती की, या प्रकारचे सीन मी करणारं, हे माहिती नव्हतं. इमरान म्हणाला की, जेव्हा तो पत्नीसोबत सिनेमागृहात मर्डर चित्रपट पाहत होता, त्यावेळी परवीनने आपल्या नखांनी इमरानच्या हाताला जखम केली होती. चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या हातावर खूप जखमा होत्या. आम्ही पहिल्या सीटवर बसलो होतो. माझ्या पत्नीने नखांनी माझे हात लाले लाल केले होते. जेव्हा मी माझा हात पाहिला तेव्हा मला जखम झाली होती आणि माझ्या हातातून रक्त वाहत होतं.’

२०१२ मध्ये इमरान हाशमीने एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना चित्रपटांमधील लव्ह मेकिंग सीनविषयी म्हटलं होतं की, ‘मी माझ्या सीनविषयी पत्नीला सांगत नाही. मी त्या चित्रपटांविषयी सांगतो जे मी करत आहे. ती याबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकत नाही. तिला चित्रपट आवडतात. पण, ती ग्लॅमरमध्ये अडकत नाही. तिचं जीवन वेगळं आहे. पण, हा माझा व्यवसाय आहे, असे ती समजून याकडे लक्ष देत नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here