तळोजा परिसरातून गहाळ झालेल्या मोबाईलचा पोलिसांनी लावला तपास

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे ) – तळोजा परिसरातून वेगवेगळ्या नागरिकांकडून जवळपास 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल गहाळ झाले होते, त्याचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेवून सदर मोबाईल आज परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित नागरिकांना वाटप करण्यात आले.

mobile-return-by-police-to-owner

तळोजा परिसरातून तसेच लातूर, त्र्यंबकेश्‍वर, चाळीसगाव, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई तसेच आसाम यासारख्या दूर राज्यात वापरण्यात येत असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय नाळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सुधीर निकम, पो.हवा.वैभव शिंदे, पो.ना.वैभव शिंदे, पो.ना.दुर्वास पाटील, सचिन पवार, पो.शि.प्रवीण पाटील, अभिजीत दगडे, संदीप माने आदींच्या पथकाने याचा तपास करून सदर 25 मोबाईल हस्तगत केले आहेत व आज त्यांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here