मेंढपाळावरील हल्ले रोका..अन्यथा महाराष्ट्र भर लोकशाही पध्दतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू – विजय शेंडगे

पुणे (पंढरी गायकवाड) – आज (दि.२१) मेंढपाळांवरील हल्ल्यानिमित्त रोष व्यक्त करण्यासाठी विजय शेंडगे यांनी मा.पंतप्रधान , मा मुख्यमंत्री व मा.विरोधी पक्षनेते यांना तहसीलदार काळे यांचे मार्फत लेखी निवेदन पाठवून महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मेंढपाळांवरील हल्यांचा निषेध व्यक्त करून मेंढपाळांवरी हल्ले न रोकल्यास रस्त्यावर उतरू असे लेखी निवेदन सादर केले.
कोहाकडी ता. पारनेर जि.अहमदनगर नगर व कुळवडी ता हवेली येथील मेंढपाळांना गावगुंडानी अमानुष मारहाण करून जखमी केले आणि उलट त्यांच्यावरच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्यामार्फत खोटे गुन्हे दाखल केले. याचा वाशिम जिल्ह्यातील सर्व जमात वांधवांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातील मेंढपाळांवरील हल्ले रोकण्यासाठी “मोक्का”सारखा कडक कायदा तयार करून गावगुंड व जंगली श्वापदापासून स्वरंक्षण होण्यासाठी बंदूक शस्त्र परवाने त्वरीत द्यावे, अशी मागणीही केली आहे. शासनाने व प्रशासनाने या वाढत्या व दररोज होणा-या अन्याय अत्याचारावर प्रतिबंध न घातलास महाराष्ट्रभर जन आंदोलन केल्या जाईल. या दरम्यान होण्या बऱ्यावाईट घटनेस शासन जबाबदार राहील, असा ईशारा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हा सचिव विजय शेंडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना या वेळी बबनराव मिटकरी , योगेश शेंडगे , नागेश वेलगे,अभिषेक मिटकरी व जमात बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here