यावल (तालुका प्रतिनिधी डॉ मोहन साळुंके) – जळगाव जिल्हाधिकारी यांच्या तीनदिवसीय लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फैजपुरात नगरपरिषद व पोलिस स्टेशन अंतर्गत संयुक्तपणे दंडात्मक कारवाई सुरू असून दिनांक २८, २९, ३० मार्च असे तीन दिवसीय लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
या तीनदिवसीय लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन जे नागरिक करीत आहे त्यांच्यावर शहरात नगरपरिषद व पोलिसांतर्फे सर्वत्र दंडात्मक कारवाई सुरू झाली असून कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासन काटेकोरपणे पालन करीत असून नागरिकांनी सुद्धा याचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा राज्यात लॉकडाऊन करावे लागणार असे वेळोवेळी जनतेला आवाहन केले आहे. आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे तरच कोरोनासारख्या भयंकर आजाराला आळा बसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
फैजपूर पोलिसांतर्फे या फैजपूर सह परिसरातील पोलिस स्टेशन हद्दीतील फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण हमीद तडवी यांच्यासह एपीआय प्रकाश वानखडे तसेच पीएसआय रोहिदास ठोंबरे पीएसआय मकसूद यांच्यासह पोलिस कर्मचारी अनिल महाजन वाहतूक पोलिस बाळू भोई दिनेश भोई एसडीपीओ वाहनचालक दिलीप तायडे तसेच अल्ताफ शेख पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी होमगार्डस सागर तायडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून तीन दिवस लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच नियमाचे पालन व बिना माक्स विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखडे यांनी सांगितले आहे.






