सावदा शहरात लॉकडाऊननिमित्त पोलिसांचा रुटमार्च

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात 28,29 व 30 मार्च असा तीन दिवस संपुर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे.याच पार्श्वभुमीवर सावदा शहरात 28 मार्च रोजी सकाळी सावदा पोलिसांनी रुटमार्च काढला.

यावेळी सावदा पोलिसांसोबतच नगरपालिका कर्मचारी देखील सहभागी झाले होते.शहरातील मुख्य रस्त्यासोबत इतर भागातुन देखील सावदा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरिक्षक देविदास इंगोले,मुख्याधिकारी सौरभ जोशी,पीएसआय पवार,नगरपालिका बांधकाम अभियंता धनराज राणे,यांचे सह सावदा पोलीस,होमगार्ड जवान,नगरपालिका कर्मचारी यात सहभागी होते.

दरम्यान 28 पासुन हा लॉकडाऊन सुरु झाल्यावर शहरात होळी असल्यावर देखील संपुर्ण शहरात शुकशुकाट होता सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद होती.दरम्यान शहरात प्रशासन कडकडीत लॉकडाऊन करीत असतांना दुसरीकडे येथील बस स्टँड जवळील बऱ्हाणपुर -अंकलेश्वर महामार्गावर एक हॉटेल चालक माञ अर्धे शटर उघडे ठेऊन तेथुन सर्रास मद्यविक्री करत होता यामुळे येथे मोठी वर्दळ माञ सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here