उत्तरप्रदेशात सख्ख्या भावांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रामपूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात शिवम आणि पवन या दोन सख्ख्या भावांनी एका 15 वर्षीय मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत एका शिवमला अटक केली आहे. तसेच दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here