आईने मुलांसमोरच पित्याची मान कापून केली हत्या

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – घरगुती वाद विकोपाला गेल्याने एका महिलेने आपल्या मुलांसमोर त्यांच्या पित्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात महिलाही जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे रविवारी दुपारी 2.15 वाजता ही घटना घडली. नवरा-बायकोत जोरदार भांडण झाले होते. वाद इतका विकोपाला गेला की नवऱा-बायकोने एकमेकांना मारहाण केली. यात संतापलेल्या महिलेने नवऱ्याच्या मानेवर धारदार चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा तडफडून मृत्यू झाला.

घरगुती हिंसेतून ही हत्या झाली आहे. महिलेच्या नवऱ्याविरोधात याआधी घरगुती भांडणे आणि बायकोला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्या इसमाचा मृत्यू झाला होतो. ती महिलाही गंभीर जखमी झाल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर महिलेवर पुढील कारवाई करण्यात येईल.

ज्यावेळी महिलेने आपल्या नवऱ्याची मान कापली त्यावेळी त्यांची मुलंही समोर होती. महिलेने धारदार चाकूने नवऱ्याच्या मानेवर वार केले. पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याचा मृतदेह घटनास्थळावरुन ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी महिलेविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here