तरुणीने चुलत भावासोबत लग्न केल्याने नातेवाईकांनी जिवंत असूनही केले अंत्यसंस्कार

चतरा (झारखंड) – आपल्या संस्कृतीत लग्न कोणाशी करावं हेही ठरलेलं असतं. पण असं असलं तरी प्रेमात काही वेळा नातेसंबंधही गुंडाळून ठेवले जातात, अशा प्रकारची घटना झारखंडमधील चतरा जिल्ह्यात घडली आहे.चतरा जिल्ह्यातील टंडवा प्रखंड येथील धनगडा पंचायतमधील खरिका या गावात ही घटना घडली आहे. या गावातील एका तरुणीने तिच्या चुलत भावासोबत म्हणजे काकांच्या मुलासोबत लग्न केले.

तरुणीच्या या निर्णयाने संतापलेल्या तिच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांनी तिचा पुतळा तयार केला. त्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली आणि स्मशानात नेऊन त्या पुतळ्याचे अंत्यसंस्कार केले. तसेच तिने केलेल्या या कृत्यामुळे तिचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी तिच्याशी कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी गावातील लोकं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुणीने केलेल्या विवाहामुळे तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकं त्यांचा निषेध करत असले तरीही लग्न केलेल्या भावा-बहिणीने मात्र आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here