शासकीय निवासस्थानात बांधकाम विभागातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – कराड तालुक्यातील कोयनानगर येथील कोयना बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष बंडू कुंभार (वय 40, रा. देशपांडेवाडी – बोपोली, ता. पाटण) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुंभार हे देशपांडेवाडी – बोपोली येथील रहिवाशी आहेत. संतोष हे जून 2020 मध्ये जलसंपदा विभागातील कोयना बांधकाम विभागात लिपिक पदावर कामास सुरुवात केली होती.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कोयना येथील शासकीय निवास्थानात कुंभार कुटुंबीय सध्या वास्त्यव्यास आहे. देशपांडेवाडी- बोपोली येथील संतोष कुंभार हे पत्नी व मुलांसह कोयनानगर येथे राहत होते. सोमवारी सांयकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here