पुणे येथे सासवडमध्ये जिलेटिनचा स्फोट; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मल्हार वाडा हॉटेलजवळ झेंडे मळा (ता. पुरंदर) येथे २८ मार्च रोजी हा प्रकार घडला आहे.

गणेश जयसिंग सरक (रा. मिरगाव, ता. फलटण) आणि खाडे (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कालिदास संपत झेंडे यांनी फिर्याद दिली आहे. ‘आरोपींजवळ जिलेटिनच्या कांड्या होत्या. २८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास या कांड्यांचा स्फोट झाला. यामध्ये एका कारसह हॉटेलचे नुकसान झाले आहे.

हा प्रकार समजताच पोलिसांनी रात्री नऊ वाजता आरोपींना अटक केली. सोमवारी आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सासवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here