जयपाल पाटील यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी अनेक पत्रकार संघटना एकवटल्या

अलिबाग सोगावकर – आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा संपादक व पत्रकार सेवा संघ मुंबई महाराष्ट्राचे प्रवक्ता, भारतीय पत्रकार संघाचे माजी सचिव तथा महाराष्ट्र गोव्याचे प्रभारी लिड इंडिया पब्लिशर्स असोस‍िएशनचे राष्ट्रीय सचिव रायगड भूषण जयपाल पाटील यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य म्हणून घेण्यात यावे, अशी पत्रकार व सामाजिक संघटनेने मागणी केलेली आहे.
जयपाल पाटील हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी आपत्ती व सुरक्षाबाबतचे शिक्षण महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल उरण, मुंबई, यशदा पुणे, भारतीय सैन्य दलाच्या शिख रेजिमेंट रांची झालखंड आणि चौथ्या जागतिक आपत्ती परिषद आय.आय.टी. मुंबई येथे घेतले असून संपूर्ण देशभरात सन २०१५ पासून ५० हजार नागरीकांना आपत्ती व सुरक्षा विषयी प्रशिक्षण दिले आहे. त्यांचे हे विशेष कार्य पाहून त्यांना नागरी संरक्षण दलाचे रायगड जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी रायगडात २५ हजार नागरीकांना हे प्रशिक्षण दिल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण हा पुरस्कार देवून गौरविले. या कामाबाबत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू यांनी राष्ट्रीय सन्मान तर अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने राष्ट्रीय सन्मानाने सत्कार केला. ते महाराष्ट्रातले आपत्तीचे प्रशिक्षण देणारे एकमेव पत्रकार असल्याने त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्याला व्हावा म्हणून संपादक-पत्रकार संघाचे अध्यक्ष किसनभाउ हासे, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम सेन, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचे महाराष्ट्राचे महासचिव सुखानंद साबदे, हुतात्मा हिरवे गुरुजी सामाजिक विकास मंडळ पनवेलचे कार्याध्यक्ष ऋषिकेश ठाकूर, महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा सोलापूरचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, श्री स्वामी परमानंद महाराज आश्रमाचे अध्यक्ष श्याम पांडुरंग पाटील, बँ.ए.टी.पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.सिध्दार्थ पाटील, लिड इंडिया पब्लिशर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, ग्रामपंचायत कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबागचे अध्यक्ष सुरेश गणपत पाटील राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र अध्यक्ष केवल महाडिक, महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना बुलढाणा अध्यक्ष दिलीप भैय्या गायकवाड शिवसेना जिल्हा ग्राहक मंच पनवेल अध्यक्ष शशिकांत डोंगरे ग्रामपंचायत सिद्धेश्वर पाली सरपंच उमेश यादव अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी जयपाल पाटील यांनी केलेल्या देशभर आपत्ती व सुरक्षेबाबत केलेल्या विशेष योगदानाबाबत विधानपरिषदेवर जाण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांच्याकडे शिफारस केली आहे. आपत्ती व सुरक्षेबाबत विस्तृत माहिती व त्यांचे कार्याचा अनुभव असलेला प्रतिनिधी आजतागायत विधानपरिषदेवर गेलेला नाही. त्यामुळे जयपाल पाटील यांच्यासारखी व्यक्ती विधानपरिषदेवर जाणं गरजेचं असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पत्रकार संघटना एकवटल्या आहेत.
येत्या डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या पाचव्या जागतिक आपत्ती परिषदेसाठी त्यांची निवड झाली असून कोवीड-१९ विषयावर निघणाऱ्या सोव्हिनारमध्ये लेखाची मागणी करण्यता आली आहे. जयपाल पाटील यांनी शालेय विद्यार्थी, आश्रम शाळेचे विद्यार्थी, नागरीक, महाराष्ट्राच्या शासनाच्या समाजकल्याण खात्याचे विद्यार्थ्यांचे वसतीगृह, नव्याने पोलिस दलात येणारे पोलिस युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाराष्ट्र पोलिस दल, १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर – पायलट, पोलिस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, पत्रकार अशा अनेक स्तरातील लोकांना आपत्ती व सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले आहे. संबंध महाराष्ट्रभर आयुष्याच्या ६३ व्या वर्षी दिवस-रात्र मेहनत करुन आपत्तीचे धडे दिले. त्याचप्रमाणे आपत्ती व सुरक्षेवर पुस्तक लिहिलं. आकाशवाणीवरुन लोकापर्यंत पोहोचले. त्याचप्रमाणे सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी यू-ट्यूब चॅनेलवर आपले व्हिडीओ अपलोड केले आहेत. थोरा-मोठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकप्रकारे प्रयत्न करुन ते आज अखंड महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. अशा व्यक्तिमत्वाची आज विधान परिषदेसारख्या अतिउच्च स्तरावर गरज आहे असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here