रामटेक येथे ७ वर्षीय मुलीवर १५ वर्षीय मुलाचा बलात्कार

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – रामटेक येथे १५ वर्षीय मुलाने सात वर्षीय मुलीवर अत्याचार केला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मुलाने मुलीला बिस्किटचे आमिष दाखविले. तिला बकऱ्याच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला.

मुलगी रडायला लागल्याने शेजारी व मुलीचे नातेवाइक तेथे आले. घडलेला प्रकार मुलीच्या नातेवाइकांच्या लक्षात येताच मुलीच्या नातेवाइकाने रामटेक पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून मुलाला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here