राजा श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव साजरा

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – दरवर्षी शिवजन्मोत्सव देश भरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो .मात्र आज देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटा चा परिणाम साजरे होणारे सणां वर दिसून येत आहे .तरी पण येणारे प्रत्येक सण धुमधडाक्यात साजरे न करता शासनाच्या नियमांचे पालन करुन आपली शिवजन्मोत्सवची पंरपरा जपत साजरे करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

नेरुळ सेक्टर १८ मध्ये सुद्धा दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या धुम धडाक्यात साजारा होत आसतो मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी आगदी साधे पणाने शासनांच्या नियमां चे पालन करत यावेळी नेरुळ येथील सेक्टर १८ मधील राजा श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानाचे पूजन चेतन मढवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी.माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे , काशिनाथ पवार, राजा श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन मढवी, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे ,म.से शहर अध्यक्ष गजानन काळे, मैत्री ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष अक्षय काळे, समाजसेवक प्रणय शिंदे, चंद्रशेखर भोपी,अभिजित देसाई व राजा श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सदस्य महेश मढवी, करण खवले, अमोल डांगे, राहुल घाडीगावकर, प्रणय साबळे, सिद्धांत खामकर, राजरत्न जाधव, धनेश ढुंबरे, अजय, प्रणिल सिद्धांत बाशा पटेल व मित्रमंडळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here