अमरावतीत ५५ वर्षीय व्यक्तीचा सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – होळीच्या सणानिमित्त गाठी देण्याचे बहाण्याने वाड्यात बोलावून एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीतील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

या प्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ५५ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर लडके असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपीला पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला. त्यावर आरोपीने त्यांनाही धमकावले.

पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित सहा वर्षीय मुलगी आपल्या घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याचवेळी आरोपी किशोरने होळीनिमित्त गाठी देतो म्हणून मुलीला घराजवळच्या वाड्यात बोलावून नेले. मुलगी तिथे गेली असता, तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. तिच्या आईने ही घटना ३० मार्च रोजी आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर दोघांनीही या घटनेबाबत आरोपीला जाब विचारला. त्यावर आरोपीने त्या दोघांनाच दमदाटी केली. त्यांना धमकावले. त्याचदिवशी दुपारी पीडित मुलीच्या आईने मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी किशोर लडके याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here