वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – आज दिनांक 01/04/2021 रोजी मा.जिल्हाधिकारी मॅडम प्रेरणा देशभ्रतार यांनी नगर परिषद हिंगणघाट येथे येऊन कोरोना संक्रमण विषयक उपाययोजना तसेच कोव्हिड लसीकरण,Antigen testing व Rtpcr test ची संख्या वाढविण्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या.

शहरातील 60 वर्षे वयावरील तसेच 45 ते 60 वयोगट मधील सर्व नागरिकांचे लसीकरण जास्तीत जास्त संख्येने करण्या बाबत सूचना दिल्या.या आढावा सभेस जिल्हा परिषदेचे सी.इ. ओ. डॉ.सचिन ओमबासे,जिल्हा आरोग्य अधिकारी ,नगर परिषदेचे अध्यक्ष मा.प्रेम बसंतांनी, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाइत,तहसीलदार श्रीराम मुंदडा, मुख्याधिकारी अनिल जगताप,पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चाचरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी कुचेवार, नगर परिषदेचे सद्यस्य तसेच कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती..



