प्रदुषणाला चाप लावत आम आदमीच्या सोयीचे लॉकडाऊन करा; सादिक खाटीक यांची जयंत पाटील यांच्याकडे मागणी

आटपाडी (प्रतिनिधी) – प्रदुषणाला चाप लावत आम आदमी ला सोयीचे लॉकडाऊन करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. श्री . जयंतराव पाटील यांच्याकडे खास पत्राद्वारे केली आहे . या खास पत्राच्या प्रती ईमेल वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठवण्यात आल्या आहेत .

आपल्या या निवेदनात सादिक खाटीक यांनी,आपण जाणताच गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री . नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत आततायीपणे कोणालाही विचारात न घेता लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्या दुर्देवाची फळे आपण आजही चाखतो आहोत. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा का ? या बाबत आपल्या सरकार कडून विचार सुरू आहे . ज्येष्ट पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि लेखक अतुल देऊळगांवकर यांनी हवेच्या आणि पाण्याच्या प्रदुषणाचा उल्लेख करत जागतीक वैज्ञानिक संस्था आणि अनेक आरोग्य तज्ञाने जे सांगीतले आहे त्यावर लक्ष वेधले आहे . हवेचे प्रदुषण अधिक असणाऱ्या भागात कोरोणाची रुग्ण संख्या आणि मृत्यूची संख्याही जास्त आहे.

अमेरिका आणि ब्राझील मध्ये अनुक्रमे साडे पाच लाख आणि पावणे तीन लाख बळी गेले आहेत . ब्रिटन, इटली, जर्मनी ,रशिया ,मेक्सिको, फ्रान्स ,स्पेन, कोलंबीया ,भारत इराण आणि इंडोनिशिया या देशामध्ये पन्नास हजाराहून अधिक बळी गेले आहेत . भारतात दरवर्षी साडे बारा लाख लोक प्रदुषीत हवेचे बळी ठरतात . अशावेळी महाराष्ट्रात भारताच्या निम्मी रुग्ण संख्या असणे हे प्रदुषीत हवेचा पुरावा देते . या प्रदुषणाचा सर्वात मोठा परिणाम मानवाच्या श्वसन यंत्रणेवर होतो . या प्रदुषणाचा घातक परिणाम मानवी अवयवांवर प्रत्येक पेशींवर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे .

एका सर्वे मध्ये मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जालना, नागपूर ,चंद्रपूर, कोल्हापूर या शहरातील हवेची गुणवता ढासळल्याचे दिसते . प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट केली आहे. या ट्विटमध्ये दियाने वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. एवढंच नाही कर तिने संशोधनावर आधारित एक अहवालही त्यासोबत शेअर केला आहे. “प्रजनन दरामध्ये माणूस संकटाचा सामना करत आहे, कारण मानवी लिंगाचा आकार लहान होत आहे आणि जनन इंद्रियही खराब होत आहे. त्याचबरोबर मानवी प्रजननालाही अवघड परिस्थितीकडे ढकलत आहे. थोडक्यात दुषित पर्यावरणाचा परिणाम हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे.” असे त्या अहवालात म्हटले आहे.

“आता तरी जग हवामान बदल, वायू प्रदुषण या मुद्द्यांना अधिक गांभीर्याने घेईल.” असे कॅप्शन दियाने तो अहवाल शेअर करत दिलं आहे. प्रदुषणाचा एकूणच मानवी आरोग्य आणि जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवावर मोठे घातक परिणाम होत असल्याचेच दितून येते . या पार्श्वभूमीवर पर्यावरणातील हवा ,पाणी, अन्नातील प्रदुषण रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे बनत चालले आहे . प्रदुषणाला रोखणे आणि निसर्गाला सुरक्षित करणे हे मानवी आरोग्याचे रहस्य ठरणार आहे .याकडे शासनाकडे गांभीर्याने बघणे महत्वाचे ठरणार आहे .

हे मान्य आहे की गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये वाहने, उद्योग धंदे ६ महिन्याहून अधिक काळासाठी ठप्प झाले होते . त्यामुळे महाराष्ट्रातील प्रदुषणाची पातळी खालावली होती . नद्या, ओढे, नाल्यांनी मोकळा श्वास घेतला होता . मात्र सरकारने जेव्हा पुनश्च : हरीओम केला त्यावेळी हे चक्र दुपटीच्या गतीने फिरले ,परिणामी आज महाराष्ट्रात मोठी रुग्ण संख्या आढळून येते आहे . आणि त्यावर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे म्हटले जात आहे . मात्र या अर्ध सत्यावर विश्वास ठेवून पुन्हा लॉकडाऊन करणे त्रासदायक ठरू शकते . त्यामुळे तर्वसामान्य नागरीक चिंतेत आहे . सरकारने पुन्हा लॉकडाऊन करू नये अशी जनतेची अपेक्षा आहे . विविध राजकीय पक्षांनीही लॉकडाऊन ला विरोध केला आहे . लोकांनी त्रिसुत्री न पाळल्याने केवळ रुग्णसंख्या वाढली असे न्हवे . या त्रिसुत्री च्या दुर्लक्षा बरोबरच श्वसन यंत्रणेतील बिघाड हा सुद्धा एक प्रमुख घटक आहे आणि तो पर्यावरण मार्गानेच सोडवता येऊ शकेल .

गावोगाव, शहरांमध्ये वाढीला लागलेली कारखानदारी, त्यातून बाहेर पडणारे घातक वायू, द्रव्ये पर्यावरणाला मोठी हानी पोहचवत आहेत, अन्न म्हणून उपयोगात येणारा भाजीपाला,फळे,धान्ये ,कडधान्ये हे ही केमिकल च्या वाढत्या वापराने मानवी आरोग्यास, जीवमात्रास हानीकारक ठरत आहेत . गावातले, शहरातले दुषीत सांडपाणी नष्ट करण्याच्या वेगळ्या व्यवस्थेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येणारे ओढे,नाले, नद्या मधून वहात असल्याने हे पाणी मोठ्या प्रमाणावर दुषीत होत आहे . ते ही जीवसृष्टीच्या आरोग्यास प्रचंड हानीकारक ठरत आहे . त्याकडे मात्र कोणी लक्ष द्यायला तयार नाही . अन्न,हवा ,पाणी हे तिन्ही घटक स्वच्छ आणि निर्जंतूक मिळाल्यास जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवाची विशेषातः मानवाची प्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणात वाढू शकते .

कसलीही औषधाची गोळी, इंजेक्शन न घेता १०० वर्षे खणखणीत निरोगी आयुष्य जगणारे आपल्या हजारो वडिलधाऱ्यांनी, पुर्वजांनी उत्तम प्रकृतीच्या रहस्यात स्वच्छ, निर्जंतुक हवा पाणी, सकस ,कसदार, स्वच्छ अन्न आणि पुरेता व्यायाम हे सुत्र दडल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे . आता सरकारला आपल्या कृतीतून हे करता येवू शकते का याचा विचार करण्याची वेळ आली आहे . सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरक्षीत अंतर ठेवून वापरात ठेवली आणि बसस्थानके रेल्वेस्थानके इथल्या गर्दीवर नियंत्रण मिळविले तर चांगला परिणाम होईल . हॉटेल आणि इतर व्यवस्थांना बंद न करता सुरक्षेच्या नियमांत बांधील राहूनच ते चालविले, विशेषतः धार्मीक आणि पर्यटन स्थळांवर या नियमांची कडक अंमलबजावणी केली तर बराच अडचणींचा भाग नष्ट होईल . सरकारी कार्यालये, खाजगी आस्थापने यांच्यातील उपस्थिती निम्म्यावर आणण्या पेक्षा त्यांच्या कामाचे वर्गीकरण कार्यालयीन आणि ऑनलाईन असे करून सर्व प्रलंबीत कामे मार्गी लावली आणि लोकांना कार्यालयात न येवू देता ठरावीक वेळामध्ये थेट ऑनलाईन संपर्क साधता आला तर लोकांची गैरसोय टळेल .

न्यायालयीन दाव्यांच्या बाबतीत सुद्धा प्रलंबीत दाव्या मध्ये सुनावण्या दोन्ही बाजुंच्या वकीलां मध्येच घेऊन गरज पडेल तेव्हाच पक्षकारांना बोलाविल्यास न्यायालयीन कामकाजाला गतीही मिळेल आणि प्रत्येकाच्या आरोग्या बाबतची अप्रत्यक्षरित्या सुरक्षितता ही वाढीस लागेल . औद्योगिक वसाहती मध्ये प्रदुषणकारी उद्योग बंद ठेवून उर्वरीत उद्योगांना चालना देत कामगार कपातीची सक्ती केली जावू नये . बांधकाम ,खणीकर्म, रस्ते विकास या कामांमध्ये असलेल्या मजुरांची रोगप्रतिकारक शक्ती लक्षात घेता या क्षेत्रावर निर्बंध लादण्यात येवू नये . खरेदी – विक्री च्या व्यवहाराला मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत पुढेही चालू ठेवावी . पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा तात्काळ उरकून पुढील ६ महिन्या साठी पुढच्या इयत्तेचा मर्यादित अभ्यासक्रम जो पालकांच्या मदतीने पूर्ण करून संपादुनुक पातळी गाठण्यापर्यत अभ्यासक्रम ठरवून तो विद्यार्थी आणि पालकांपर्यत सुरक्षितपणे पोहचविण्यात यावा . दहावी पासूनचे पुढचे शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन असे सुरूच ठेवून त्रिसुत्रीला प्राधान्य दिले जावे .

बाजारांच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय न घेता, ठिकठिकाणच्या प्रशासकीय संस्थाना निर्णयाचे अधिकार दिल्याने शासनाची बदनामी होत आहे. त्यामुळे राज्यात एकच व्यवस्था चालविण्यात यावी . सांगली जिल्हयातील बाजार २ आठवडे बंद ठेवण्याचा आदेश असताना जत तालुक्यातल्या माडग्याळ येथील शेळ्यामेंढ्याचा बाजार कोणाच्या सुचनेने भरवला गेला . बाजारात येणाऱ्यांना गेटपास कसे दिले गेले . पोलीसांच्या लाठी हल्यात शेतकरी – व्यापारी यांना मोठा प्रसाद मिळाला , झालेल्या पळापळीत अनेकांची जनावरे हरवली . कित्येकांचे पैसे पडले . काही जण जखमी झाले . बाजार भरविण्यास कारणीभूत ठरलेल्या संबधीतांवर आणि लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास सत्वर कारवाई केली जाणे महत्वाचे आहे .

ज्या भागात कोरोनाचा उद्रेक होतोय असे लक्षात येताच तेथे साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवस त्या भागाचा संपर्क तोडण्यात यावा . मात्र त्यांना सर्व सुविधा मिळण्याची व्यवस्था व्हावी . अन्न धान्य पुरवठ्यां प्रमाणेच प्रत्येक कुटुंबाला निर्वाहासाठी काही रोख रक्कम सरकार मार्फत दिली जावी . कार्बन उत्सर्जन, जल – वायू प्रदुषण रोखणे यांना प्राधान्याने प्रशासकीय काम मानले जावे . मदत – पुनर्वसन प्रमाणेच हे क्षेत्र तुद्धा कायम स्वरूपी सक्रीय राहील अशी भरघोष तरतूद करून सरकारने कठोरपणे पावले उचलावीत तरच या संकटातून महाराष्ट्राची मुक्तता होईलं . याबाबत गांभीर्याने विचार करावा . अशी अपेक्षा ही शेवटी सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here