कर्जत लोहमार्ग पोलिसांनी केला खूनाचा गुन्हा उघड

मुंबई (सहसंपादक अनिल नलगे) – दिनांक 17.03.2021 रोजी रात्री सुमारे 01.15 वा.चे सुमारास कर्जत ते भिवपुरी रेल्वे स्टेशन कि.मी.नं. 98/4 च्या जवळ डाऊन रेल्वे ट्रॅकला एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत मिळुन आल्याने, सद कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरुन जिवे ठार मारुन तो रेल्वे अपघात वाटावा या उद्देशाने प्रेत रेल्वे रुळावर टाकुन दिले असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले. त्याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक खेतमाळीस यानी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरुन कर्जत रेल्वे पोलीस ठाणे येथे गु.र.नं.17/2021 कलम 302 भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाची माहीती मिळताच गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. मयत इसमाची ओळख पटविण्यासाठी ठाणे, मुंबई, पालघर, अमरावती, सोलापुर, नगर, सातारा, पुणे इत्यादी ठिकाणी पोलीस तपास पथक पाठवुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालु होता. त्यादरम्यान ठाणे येथील तीनहातनाका येथील तपास पथकास मयताचा फोटो ओळखणारे नातेवाईक व मयताची पत्नी मिळुन आली. त्यांचेकडे चौकशी करता, सदर गुन्ह्यातील मयत इसमाचे नांव रवी बाबु पवार, वय 45 वर्षे, राह. मंगळुरची वाडी, ता.मानगाव, जि.अमरावती असे असुन, तो दिनांक 16/03/2021 रोजी जावई शैलेश भोसले याचेबरोबर गेला तो परत आला नाही असे समजले. तसेच मयताचे नातेवाईक यांनी शैलेश भोसले यानेच सदरचा खुन केला असल्याची शंका व्यक्त केली.

त्यावरुन शैलेश भोसले याचा पोलीस तपास पथकाकरवी शोध घेतला असता, गुन्हे शाखेच्या तपास पथकास तो दिनांक 30/03/2021 रोजी ठाणे परिसरात येणार असल्याची गुप्त खबर मिळाली. त्या खबरीवरुन सापळा लावुन त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे केले चौकशीत त्याने सदरचा खुन केल्याचे निष्पन्न झाले. सदरचा खुन त्याने मयताची पत्नी हिचेबरोबर असलेले अनैतीक संबधातुन केल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न झाले आहे.सदरचा गुन्हा उघड करणेसाठी कोणताही पुरावा अगर धागादोरा नसतानाही गुन्हे शाखेच्या पोलीस . अधिकारी/ अंमलदार यांनी अथक व अहोरात्र परिश्रम करुन गुन्हा उघडकीस आणला आहे

सदर गुन्ह्याचा तपास कैसर खालीद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई, एम.एम.मकानदार, पोलीस उप आयुक्त, प्रदीप चव्हाण, पोलीस उप आयुक्त, सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदर्शन व सुचनानुसार गुन्हे शाखा, लोहमार्ग, मुंबई येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार, पोलीस निरीक्षक शहाजी निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन लोखंडे, हेमराज साठे, पोलीस उप निरीक्षक, श्रीकृष्ण चव्हाण, अशोक होळकर, दिपक शिंदे, शंकर परदेशी, प्रकाश चौगुले व गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांनी व कर्जत रेल्वे पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन मयत इसम व आरोपी यांना निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here