व्हिडीओ गेम खेळू दिला नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या

नोएडा (उत्तर प्रदेश) – येथे एका अल्पवयीन मुलाने व्हिडीओ गेम खेळण्यापासून रोखले म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या पंधरा वर्षीय मुलाने रागाच्या भरात एका इमारतीवरून उडी घेत स्वत:चे जीवन संपवले.

मुलगा सतत व्हिडीओ गेम्स खेळत असल्याने गुरुवारी आई-वडिल त्याच्यावर रागवायचे. बुधवारी देखील तो गेम खेळत असताना त्याच्या आईने त्याला व्हिडीओ गेम्स खेळण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेला मुलगा घरातून निघून गेला. मात्र राग शांत झाला की परत येईल या विचाराने आई-वडिलही निर्धास्त होते. संध्याकाळ झाली तरी मुलगा परत आला नसल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. अखेर शुक्रवारी एका बिल्डींगचे कंस्ट्रक्शनचे काम सुरु होते त्याठिकाणी एक मृतदेह सापडला. ओळख पटवण्यासाठी आई-वडिलांना बोलावले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो त्यांच्याच मुलगा होता. मुलगा एवढा डोक्यात राग घेऊन असे पाऊल उचलेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना आली नव्हती.

या अल्पवयीन मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. तपासात ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर याचा खुलासा होईल. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here