मुलीचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर केले अपलोड, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली – अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो सोशल मिडियावर टाकून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी चार जणांविरोधात विनयभंग आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.

तौसीफ, अरबाज, प्रदीप आणि करण शर्मा यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तक्रारदाराच्या मुलीला तिचे अश्लिल फोटो पाठविण्यास भाग पाडले. संबंधित फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून तिचे अश्लिल फोटो अपलोड केले.

याबाबत तरुणीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here