मलायका अरोराने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस आज लिलावती रुग्णालयात घेतला. कोरोनाची लस घेत असतानाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही तासातच तिने शेअर केलेल्या या फोटोला 2 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत.

मलायकाने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी कोविड व्हॅक्सिनची पहिली लस घेतली आहे. योद्ध्यांनो, या विषाणुच्या विरोधात लढण्यासाठी तुम्हीही लस घ्यायला विसरू नका. तसेच जे या काळात अत्यंत सक्रीय होते, कठीण काळातही ज्यांनी आपल्या चेहऱ्यावर हसू आणून या परिस्थितीतही मनापासून काम केले, अशा कोविड योद्ध्यांना माझा सलाम. धन्यवाद.’

मुंबईत कोविड19 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही आठवड्यात बऱ्याचशा बॉलीवूड सेलिब्रिटींना कोरोना झाला. तसेच काही ठिकाणी असेही आढळले की, कोरोनाची पहिली लस घेतलेली असूनही त्यांना कोरोना झाला. कोरोनाकाळातही सेलेब्रिटी काम करत आहेत. अत्यंत धक्कादायक वातावरणातही शूटिंग करत आहेत. यामुळे त्यांना कोरोना होण्याचा धोका वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here