तैवान – येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या महितीनुसार तैवानमध्ये एका बोगद्यातून रेल्वे जात होती. तेव्हा रेल्वे रुळावरून घसरली. रेल्वेमध्ये तेव्हा 350 प्रवासी होते. या अपघातात 36 प्रवाशांच्या मृत्यू झाला असून 72 प्रवासी जखमी झाले आहेत.
हा अपघात आज शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास झला. प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 60 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Taiwan train crash kills 36 in deadliest rail tragedy in decades https://t.co/NeciWXHUtQ pic.twitter.com/eD9FxhLeiV
— Reuters (@Reuters) April 2, 2021






