शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) – शहरात साईभक्तांची होत नसलेली गर्दी व महाराष्ट्रात कोरोणा महामारीचा वाढता उद्रेक पाहता परराज्यातून येणाऱ्या साईभक्तांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन घेऊ साईबाबा संस्थानच्यावतीने साईभक्त भाविकांना प्रसाद रुपी शुध्द तुपाचे २५रुपये किमतीचे लाडू प्रसाद वितरण गर्दीच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आले असल्याची खात्रीलायकरित्या समजते.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शिर्डी शहरात येणाऱ्या साईभक्तांना साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रसाद रूपी लाडू प्रसादाचे पाकीट विक्री माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असते त्यासाठी विविध ठिकाणी काउंटर देखील सुरुवात करण्यात आलेले आहेत असे असताना काही दिवसांपूर्वीच बंद असलेली ही लाडू विक्री सुरुवात करण्यात आली होती मात्र कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर साईभक्त भाविकांची कमी होत असलेली गर्दी त्यामुळे हे लाडू पाकीट खराब होऊ नये अथवा पडून राहू नये या दृष्टिकोनातून साईभक्तांच्या कमी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन थांबवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसात कोरोणा रुग्ण संख्येचा वाढता वेग पाहता मोठ्या प्रमाणावर साईभक्तांनी शिर्डी कडे पाठ फिरवलेली आहे त्याचा काहीसा परिणाम लाडू विक्री वर देखील होत होता त्यामुळे या सर्व अडचणी डोळ्यासमोर ठेवून साईबाबा संस्थान ने लाडू विक्री साठी तयार करण्याचे काम तूर्त काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले असल्याचे या विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.






