वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – दारु मुक्ती आंदोलनाच्यावतीने व विर भगतसिंह विद्यार्थी परिषद;नेहरु युवा मंडळाचे युवक व युवतींची सभा वडनेर ता. हिंगणघाट येथील युवा प्रेरणा संस्थेचे हॉलमधे दि.27 रोजी विकास तिजारे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना बंधने पाळून संपन्न झाली.
त्यामधे प्रामुख्याने शिक्षित तरुणांमधील बेरोजगारीची व मातृभूमिची सेवा करण्यास भगतसिंगाचे वारसांना सेवा करण्यास तत्पर असणाऱ्या तरुणाईला राज्यकर्त्यांनी संधि देण्यापासून वंचित ठेवले आहे; रोजगार देण्याऐवजी त्याचे समोर दारुचा पेला दिल्या जात आहे, व्यसनाधिन बनवून;त्यांचे तारुण्य उध्वस्त केले जात आहे. वडनेर परीसरच नव्हे तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात गावोगांव दारु विक्रीची दुकाने सर्रास सुरु आहेत, गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामोद्योग युक्त वर्धा जिल्हा व समर्थ भारत घडविण्याची जबाबदारी येथील जिल्ह्याधिकारी;प्रशासकाची व निवडणूक दिलेले आमदार; लोक प्रतिनिधीची असतांना ते सर्व निष्क्रिय असल्याची उपस्थित युवक- युवतींनी केली.
खेड्यातून येणाऱ्या मुलींना शिक्षण घेण्यास येण्यासाठी बस; विज सेवा नाही; अभ्यास करता येत नाही, कोरोना ग्रस्त स्थितीत रोजगार नाही, पैसे नाहीत; विज कनेक्शन तोडल्या जात व अन्याय होत आहे; त्यावि रुद्ध संघटीत आवाज उठविण्याची चर्चा बैठकीत करण्यात आली. जिंकू किंवा मारु; तरी गांधी जिल्ह्यात दारु बंदी करु, हर जोर जुल्मके खिलाफ संघर्ष हमारा नारा है, दारु बंदी कायद्याची अंमलबजावणी करा नाही तर आता उठवू सारे रान; आता पेटवू सारे रान;राज्यकर्ते व अधिकाऱ्यांची करु दाणादाण आदी घोषणा बैठकीत देण्यात आल्यात. तसेच याकरीता जनजागरण व आक्रोश आंदोलनाचे नियोजनाकरीत कृति समिती करण्यात आली.
राहुल दुरतकर तहसिल संघटक, सचिन महाजन, सचिव, जिल्हा समन्वयक गणेश शेळके,निखिल कळस्कर सहसंघटक; डॉ. रविंद्र बोरकर, विकास तिजारे;सहसचिव,सदस्य विनय कुंभलकर; आरती बोरकर, मिनल जारोंडे, बैठकीनंतर उपरोक्त समितीने मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्ररतार यांचेकडे तसेच तहसिलदार मुंदडा, हिंगणघाट राजेश शेटे, ठाणेदार, वडनेर यांना तातडीने दारु बंदी करा, ग्राम सुरक्षा दल, व तहसिलदाराचे अध्यक्षतेखाली व्यसनमुक्ती समीती करण्याच्या मागणीचे निवेदने पाठवलीत.
या बैठकीला परीसरातील युवक; युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. दारु मुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी या तरुणांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे व अन्यायाचे लढ्यात पाठींबा जाहिर केला.



