अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – शहरातील प्रिंस वेल्फेयर ट्रस्ट संचलित दार उल उलूम नूरिया कादरिया ख़ानख़ाह शरीफ या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी हाफ़िज़ अनीस यांनी दिनांक ३१ मार्च रोजी पहाटे ५:३० पासून ते सायंकाळी ६:३० पर्यंत सलग तब्बल तेरा तास इस्लाम धर्मियांच्या पवित्र धर्म ग्रंथ कुराण शरीफचे पठण करून एकाच बैठकीत संपूर्ण कुराण पूर्ण केल्याची अक्कलकोट तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याने हाफ़िज़ अनीस यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

यासाठी हाफ़िज़ अनीस यांनी तब्बल चार वर्ष कठोर मेहनत केली असून, हाफ़िज़ अनीस यांनी कुराण शरीफमध्ये न पाहताच तब्बल तेरा तास सलग कुराण शरीफचं वाचन करणं ही सोपी गोष्ट नसल्याचं हाफ़िज़ अकरम यांनी बोलतांना सांगितलं. हाफ़िज़ अनीस यांनी एकाच बैठकीत अगदी न पाहताच तब्बल तेरा तासात संपूर्ण कुराण शरीफचं वाचना मागे संकुलाचे अध्यक्ष हाफ़िज़ अब्दुल रउफ पिरज़ादे साहेब यांचं मोलाचं योगदान असल्याचं मुफ़्ती अबुरागिब यांनी सांगितलं.
या कुराण शरीफच्या वाचना प्रसंगी परिक्षक म्हणून मौलाना इब्राहिम,मौलाना महताब आलम, हाफ़िज़ निज़ाम,हाफ़िज़ इश्तियाक रज़ा,हाफ़िज़ बिलाल,हाफ़िज़ आबिद तालीकोटे आणि सरफराज इमाम यांनी काम पाहिले. यावेळी न पाहता संपूर्ण पवित्र कुराण शरीफचं तब्बल तेरा तासात एकाच बैठकीत वाचन पूर्ण करणाऱ्या हाफ़िज़ अनीस यांचं मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.






