मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल रात्री लॉकडाऊनबद्दल काय बोलले?

मुंबई (संदेश काटकर) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल रात्री प्रसारमाध्यमांवर लाईव्ह आले. राज्यातील जनतेला कोरोनाशी लढण्याची हिम्मत देतानाच त्यांनी धीरही दिला आणि उपाययोजनांबाबतही भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा हाहाकार सर्वत्र उडत असतानाच कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यात अपयश येत आहे. मी घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे. कोरोनानें आपल्यावर मात करता कामा नये आपण कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी पुढील पंधरा दिवस महत्वाचे आहेत. या पंधरा दिवसात सर्वांनी प्रतिबंधक उपायांचा अवलंब करून कोरोनाला हरवायचे आहे. कोरोनाच्या काळात राजकारण नको. मास्क न वापरणं यात कसले आलेय शौर्य? लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला येत्या दोन दिवसांत आणखी काही अधिकाऱ्यांशी बोलून लॉकडाऊनला काही पर्याय आहे का याचा विचार करणार. लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम आहे. लस घेतली तरी मास्क घालणं अनिवार्य. लॉकडाऊन हा खूप घातक उपाय, पण आपण सध्या कात्रीत सापडलोय. सरकार खंबीर आहे, कोरोनाविरोधातील लढाईसाठी एकजुटीने सिद्ध व्हा, राज्यात कडक निर्बंध लादणार, येत्या एक-दोन दिवसात नियमावली जाहीर करणार. मी कोरोनाला हरवणार, मी कोरोनाला रोखणार, असं प्रत्येकानं ठरवायला हवं मार्चपासून कोरोना अक्राळविक्राळ स्वरूपात वाढतोय त्याला रोखणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here