छगन भुजबळ एक्शन मोडमध्ये

chagan-bhujbal

मुंबई (संदेश काटकर) – नाशिकमध्ये कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ज्या वैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टरांनी कामात कसूर केली, हलगर्जीपणा दाखवला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सिविल सर्जन रत्ना रावरंडे याना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि वैद्यकीय गलथान कारभार यावर छगन भुजबळ रागावलेले पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून रावरंडे याना सक्तीच्या रजेवर पाठवले. कालच्या बैठकीत नाशिकमध्ये कोरोना वाढण्यास काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे छगन भुजबळ म्हणाले होते आणि संबंधितांना त्यांनी तशी समजही दिली होती. ते म्हणाले नागरिकांनी बेफिकीरपणा दाखवला हे तर आहेच पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनीहि बेफिकीरपणा दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here